श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे ‘सोमवती अमावस्या’ उत्साहात साजरी
रिमझिम पावसाच्या सरींमध्ये ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष
निमगाव । सह्याद्री लाइव्ह । श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे दरवेळी प्रमाणे सोमवतीच्या निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी (दि. १७) खंडोबा मंदिरावर सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. नेहमीप्रमाणे सकाळी देवाची पालखी भीमानदीवर अंघोळीसाठी रवाना झाली. ग्रामस्थांसोबत अनेक भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी पावसानेही हजेरी लावली होती. ग्रामस्थांनी रिमझिम पावसाच्या सरींमध्ये देवाचे स्वागत केले.
खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव येथे खंडोबा देवाचे सर्वच उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. दर सहा महिन्यानंतर म्हणजे वर्षातून दोनदा आणि क्वचित तीनवेळा सोमवारच्या दिवशी अमावस्या येते. या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी देव खंडोबा अंघोळीसाठी भीमानदीवर जातात अशी धारणा आहे.
सोमवती अमावस्या
सोमवती अमावस्येच्या दिवशी देवाला पालखीमध्ये बसवून नदीवर अंघोळीसाठी नेले जाते. ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत असतात. भीमा नदीवर देवाचे स्नान उरकल्यानंतर देवाची पालखी दर्शनासाठी गावात ठेवली जाते. दरवेळीप्रमाणे आजही हा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांसोबतच अनेक भाविकांनी हजेरी लावली होती.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES