हुतात्मा राजगुरू स्मारक निधीवरून सोशल वॉर
आमदार दिलीप मोहिते आणि अतुल देशमुख समर्थकांमध्ये श्रेयवाद सुरू
राजगुरूनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २४८ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना पोलीस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मात्र त्यानंतर खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते आणि भारतीय जनता पक्षाचे खेड-आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियात वॉर रंगले आहे. आमदार दिलीप मोहिते समर्थकांनी राजगुरू स्मारकाच्या विकास आराखड्याचा १०४ कोटी रुपये आणण्याचा प्रश्न मार्गी लावल्याचा सोशल मीडियातून ‘प्रचार’ केला. तर भाजपचे अतुल देशमुख समर्थकांनी “हुतात्मा राजगुरु विकास आराखड्याला प्रयत्न कले अतुलभाऊंनी आणि त्याचे श्रेय घ्यायला आलेत दुसरे… सर्वांना माहित आहे की निधी कोणी मंजूर करून आणला”. शब्दात या प्रचाराला उत्तर दिले.