SET परीक्षा २६ मार्चला होणार
by
sahyadrilive
November 10, 2022 3:49 PM
पुणे । सह्याद्री लाइव्ह । राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा अर्थात सेटची घोषणा करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २६ मार्च २०२३ रोजी ३८ वी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची यंदाची तारीख विद्यापीठाने जाहीर केली आहे.
या पीरक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह ७ डिसेंबर आहे. सहायक प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी १९९३ पासून ही परीक्षा घेतली जाते. दरवर्षी साधारणतः सहा टक्के उमेदवार उत्तीर्ण होतात. उमेदवार सहायक पदासाठी पात्र तर ठरतो, यावर्षीची सेट परीक्षा सप्टेंबर होणार होती परंतू काही अडचणींमूळे परीक्षेला विलंब झाला आहे.