पुणे ज्ञान समूहाकडून विद्यार्थीनी आणि महिलांना शिष्यवृत्ती
विज्ञान-संशोधनाच्या क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन
पुणे । सह्याद्री लाइव्ह । पुणे ज्ञान समूहाकडून ‘वी ज्ञान’ उपक्रमांतर्गत विद्यार्थीनी आणि महिलांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विज्ञान-संशोधनाच्या क्षेत्रात प्रगतीशील राहण्यासाठी महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै असल्याची माहिती पुणे ज्ञान समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिया नागराज यांनी दिली आहे.
उद्योजक महिलांना अनुदान
राज्यातील अल्प उत्पन्न गटातील आणि उपेक्षित समाजातील, पदवीपुर्व स्तरावरील विद्यार्थिनींना तीन महिन्यांसाठी प्रतिमाह १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच उद्योजक महिलांना ६ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान आणि ६ महिन्यांसाठी दरमाह १५ हजारांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील रसायनशास्त्र आणि संबंधीत विषयांच्या पदवीपुर्व आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थिनी आणि महिला उद्योजकांसाठी गेल्यावर्षी ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. आलेल्या २५० अर्जांतून सात पदवीपुर्व आणि १० पदव्युत्तर विद्यार्थीनींना आणि उद्योजिका विभागातून चार महिलांना पी. एच. डी. साठी शिष्यवृत्ती देण्यात आली होती.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES