मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; पहिल्या वर्षासाठी २५ कोटी रुपये मंजूर
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । राज्यातील मराठा व कुणबी या जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून सुरू केली जाणार आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने याबाबत प्रस्ताव मांडला होता. प्रदिर्घ काळानंतर मंगळवारी (दि. ४) मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली. या योजनेसाठी पाच वर्षांसाठी २७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या वर्षासाठीच्या २५ कोटींना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीचे अध्यक्ष होते.
परदेशातील क्यू एस वर्ल्ड रॅंकिंगमध्ये दोनशेच्या आत मानांकन असलेल्या विद्यापीठ आणि शिक्षणसंस्थांमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य, कला, अर्थशास्त्र, विधी आणि औषधनिर्माण या अभ्याक्रमांसाठी ५० पदव्युत्तर, पदवी, पदवीका आणि २५ डॉक्टरेट अशी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES