राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त सर्व धर्म सभा कार्यक्रम साजरा
मुंबई। सह्याद्री लाइव्ह। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी स्मारक समिती व हरिजन सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म सभा कार्यक्रम मंत्रालयाच्या शेजारील उद्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आयोजन करण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध समाजातील धर्मगुरू यांनी आपल्या मातृभाषेतून सर्व धर्म प्रार्थना सादर केली.
यावेळी महात्मा गांधी स्मारक समितीचे सचिव व हरिजन सेवक संघाचे उपाध्यक्ष सुमन पोवार,महात्मा गांधी स्मारक समिती मंडळाचे सदस्य व सचिव प्रा अमर सिंघ ,सदस्य रवी बांगर, भारत खाडे, संतोष भोईर, तुकाराम पाटील, विठ्ठल महेंद्रकर,कुलाबा महानगरपालिकेचे विद्यार्थी यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित मनोगत यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.