शासनाच्या नाकर्तेपणामुळे राजगुरू वाड्याच्या रक्षणासाठी सरसावली युवाशक्ती… अथक प्रयत्नानंतर राजगुरू जन्मस्थळाने घेतला मोकळा श्वास…
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राष्ट्रीय स्मारक असलेल्या राजगुरूवाड्या कडे मात्र शासनासह अवघ्यांचे केवळ दुर्लक्षच होत असताना राजगुरुनगर मधील युवा कार्यकर्त्यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे.
स्वातंत्र्याची किंमत त्यांनाच माहीत होती की ज्यांनी पारतंत्र्याच्या झळा सोसल्या होत्या. घराबाहेर पाऊल टाकण्याआधी ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचार आणि अन्यायाचा चीड आणणारा इतिहास समजावून घेतला असता आणि जर तो धाक नजरे समोर असता तर आजही प्रत्येकाला त्या पारतंत्र्याच्या किंमत समजली असती.वाईट इतकंच वाटतं की महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात स्वातंत्र्याचा हा लढा प्राण्यांचे मोल देऊन धीराने लढणाऱ्या त्या वीराच्या
भीमा नदीपात्रा लगत असलेल्या या राजगुरू वाड्याच्या तटबंदीला असणारी धोकादायक झाडी गेली कित्येक वर्ष अशीच या वास्तूला इजा करू पाहत होती. त्या झाडीमुळे या वास्तूला होणाऱ्या वेदना खुद्द राजगुरुनगर वासियांना सुध्दा कधी जाणवल्या नाहीत याचीच काय ती खंत.
अशा या ऐतिहासिक वास्तूंचे आजच्या पिढीने जतन केले नाही तर भविष्यात त्या काळाच्या पडद्याआड देखील जायला वेळ लागणार नाही. हे लक्षात घेऊन
हुतात्मा राजगुरू स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने व दुर्गरक्षक फोर्स परिवाराच्या प्रेरणादायी तरुणाईने मात्र हुतात्मा शिवराम हरी राजगुरू त्यांच्या निवासी वाड्याला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात टाकून हे स्वच्छतेचे व साफसफाई चे कार्य पूर्णत्वास नेले आहे.आणि या वाड्याच्या आजुबाजूला वाढलेली झाडेझुडपे काढून टाकली आहेत.
या मोहिमे दरम्यान स्मारक समिती चे अध्यक्ष अतुल भाऊ देशमुख, सुशील मांजरे, शैलेश रावळ, बाळासाहेब कहाणे, प्रविण गायकवाड, योगेश गायकवाड, नरेंद्र गायकवाड, सचिन भंडारी. विश्वनाथ गोसावी संजय नाईकरे, प्रविण वायकर, विठ्ठल पाचारणे,अरविंद गायकवाड, नितिन शाह,तसेच दुर्ग रक्षक फोर्स संस्थापक अध्यक्ष जयकांत शिंक्रे, मुख्य मोहीम प्रमुख शिवकन्या वर्षा चासकर,
नियोजन सहकार्य पुणे विभाग प्रमुख योगेश गायकवाड, दुर्ग रक्षक फोर्स अशोक खांडेकर, छत्रपती संभाजी महाराज नगर विभाग प्रमुख दत्ता वाघ,नाशिक विभाग सदस्य सागर पवार, संपर्क विभाग प्रमुख जानवी एडवणकर,बीड जिल्हा विभाग प्रमुख भरत दादा पघळ,दुर्ग रक्षक अतिष दादा मोहिते , शिवकन्या त्रिषा मोहिते, दुर्ग सेवेकी पूनम मोहिते, मुख्य सदस्य राज पोतदार, मुख्य सदस्य शिवराम काळंगे ,दुर्ग सेविका अमृता काशिद उपस्थित होते.
या कार्यासाठी राजगुरुनगर शहरातून आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले आहे.