आळंदीतील ‘एमआयटी’मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील ग्रंथालय विभाग व विद्यार्थी विकास कक्ष त्यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
एम. आय .टी . कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (आळंदी)येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या सरदार वल्लभभाई पटेल यांची १४७ वी जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रथम वर्ष बी.बी.ए विभागातील. प्रा. तनिष्का वीर व आश्वर्य काकडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आणि आजच्या भारतीय समजणे कशा प्रकारे देश सेवा केली पाहिजे हे अत्यंत प्रभावीपणे मांडले.
तसेच यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्य डॉ. मानसी अतितकर आणि उपप्राचार्या प्रा. अक्षदा कुलकर्णी, विद्यार्थी विकास कक्ष अधिकारी डॉ. मंगेश भोपळे, ग्रंथपाल राहूल बाराथे, सुनीता साबळे, सुवर्णा सानप, विविध विभागांचे विभाग प्रमुख व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश मते यांनी केले. विजय पाटील यांनी आभार मानले.