आखरवाडी येथे सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह। खेड तालुक्यातील चासकमान येथील जवाहर विद्यालय व जिल्हा परिषद शाळा आखरवाडी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा व एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक व सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष ॲड. अरुण मुळूक, आखरवाडीच्या सरपंच मोनिका मुळूक, उपसरपंच विठ्ठल मुळूक, ॲड. कोंडीभाऊ कोबल, दिगंबर मुळूक यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प, श्रीफळ, पेन व पुस्तक देऊन सन्मानित केले.
तसेच एनएमएमएस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आयुष केमाळे, पायल कदम, व सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी दिव्या नाईकरे, अनुष्का ढमाले, श्रुती कर्वे, समीक्षा शिंदे, हर्ष रणपिसे, ओम कामथे, सुरज घनवट, स्वराज राक्षे, नितेश नाईकरे, सुजन नाइकरे, प्रणव मेदगे या विद्यार्थ्यांना पेन, गुलाबपुष्प व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यावेळी ॲड. अरुण मुळूक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक व्ही. डी. निमसे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
एस. जी. साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर डी. एम. लाडके यांनी आभार मानले.