संत निरंकारी मिशन तर्फे विश्व पर्यावरण दिवसा निमित्त लोणावळा-खंडाळा येथे विशाल स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान संपन्न…!
लोणावळा (पुणे): ५ जून,२०२२: संपूर्ण विश्वामध्ये ‘ विश्व पर्यावरण दिवस’ साजरा होत असताना संत निरंकारी मिशन आणि लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा-खंडाळा या ठिकाणी विशाल स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान संपन्न झाले. या अभियानाला सुमारे ३००० हुन अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. ज्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पर्यटक जास्त संख्येने जातात, अशा ठिकाणी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या आपली पृथ्वी ग्लोबल वार्मिंग च्या संकटाचा सामना करत आहे अशावेळी आपल्याला वृक्षारोपण सारखे अभियान राबविण्याची नितांत गरज आहे ज्याच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल.
लोणावळा-खंडाळा परिसरात सकाळी ७:३० ते १२:३० या वेळेत मुंबई-पुणे महामार्गाचे दोन्ही बाजूचे रस्ते, खंडाळा ते अमृतांजन पॉईंट,वलवन तळे, कावेरी फार्म,नागरगाव,लोहगड उद्यान,रायवूड ते लोणावळा डॅम गेट,आय.एन.एस. ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन,नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा येथे स्वछता अभियान संपन्न झाले. तसेच या ठिकाणी सुमारे २०० हुन अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. मिशनच्या युवा स्वयंसेवकानी प्लास्टिक प्रदूषणाच्या थीमवर लघू नाटिकांचे आयोजन करून लोकांना पर्यावरण संकटाविषयी जागृत होण्याची प्रेरणा दिली, त्याचबरोबर नो प्लास्टिक युज /बिट एअर पोल्युशन /स्वच्छता व वृक्षारोपण विषयी संदेश देण्यासाठी बॅनर घेऊन मानवी शृंखला द्वारे देखील संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला विनोद वोहराजी (मेंबर इंचार्ज-सेवादल आणि परराष्ट्र व्यवहार विभाग, संत निरंकारी मंडळ, दिल्ली) पंडित पाटील (मुख्यधिकारी, लोणावळा नगरपरिषद), भगवान खाडेजी (उप-मुख्यधिकारी, लोणावळा नगरपरिषद), तन्वीर मेमनजी (आरोग्य अधिकारी), तसेच नगरपरिषदेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
लोणावला व खंडाळासह महाबळेश्वर,पाचगनी,पन्हाळा,सापुतरा, मसूरी,ऋषिकेश, लैंसडौन ,नैनीताल ,शिमला,नंदी हिल्स, माउंट अबू ,गंगटोक अशा १४ ठिकाणी हे अभियान मिशनच्या माध्यमातून संपन्न झाले. संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जनजागृतीसोबतच मानवतेच्या कार्यात निरंतर अग्रेसर आहे. दरवर्षी संत निरंकारी मिशन स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर असे सामाजिक उपक्रम राबवित आहे.
पुणे झोन चे प्रभारी ताराचंद करमचंदानीजी यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.