संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकुब करत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा कोढडीतील मुक्काम वाढला आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत ऑगष्ट महीन्यापासुन ‘ईडी’च्या काठडीत आहेत. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी त्यांनी पी. एम. ए. न्यायालयात धाव घेतली असून त्यावर मागील सुनावणी ५ ऑक्टोबर ला झाली होती. तेव्हा त्यांच्या कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यासंदर्भात आज होणारी सुनावणी वेळेअभावी तहकुब करत १७ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत पक्षाचे नवे चिंन्ह आणि नवे नाव लोकांपर्यंत पाहोचवू आणि नव्या जोमाने काम करू असे अश्वासन दिले. शिवसेनेचं नवं चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.