अखेर संजय राऊत यांचा जामिन मंजूर
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.
पत्राचाळ घोटाळा या प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.
दरम्यान आज संध्याकाळपर्यंत ते बाहेर येण्याची शक्यता आहे. तर संजय राऊत यांच्या जामिनावर ईडी हायकोर्टात जाणार आहे. तर संजय राऊत यांच्या जामिनावर ईडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. विशेष पीएमपीएल कोर्टाकडून खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर केला आहे.