प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
by
sahyadrilive
November 26, 2022 12:02 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । मराठी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या त्यांच्या अविस्मरणीय अशा करकिर्दीचा हा सन्मान होत आहे. त्यासंदर्भात त्यांनी स्वता: सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे.
या पोस्टमध्ये दामले यांनी, “आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामूळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला, असंच प्रेम असुदे..” अस म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.