मराठा आरक्षणातुन मिळालेल्या पदांना मंजुरी
by
sahyadrilive
August 25, 2022 4:58 PM
मुंबई | सह्याद्री लाइव्ह | मराठा आरक्षणानुसार नियुक्ती झालेल्या पण नंतर आरक्षण रद्द झाल्यामुळे नोकरी धोक्यात आलेल्या एसीबीसी बाधित उमेदवारांच्या नोकऱ्या कायम ठेवण्यासाठीचे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यानुसार अधिसंख्य पदांना मंजुरी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर १०६४ अधिसंख्य पदांना मंजुरी देण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले. या उमेददवारांची मराठा आरक्षणानुसार उमेदवारांची निवड झाली होती. मात्र कोविड कारणास्तव या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यांत आलेल नव्हते. त्यानंतर मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या १०६४ नियुक्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या अधिसंख्य पदांना मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी दिल्यानंतर आज हे विधेयक सभागृहात ठेवण्यात आले.