बहिणीची छेड काढली म्हणून सख्या भावांनी मित्राला संपवलं
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । चांडोली येथे बहिणीची छेड काढल्याचा राग मनात ठेवून एका तरूणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. चांडोली येथील महाराष्ट्र फल उत्पादन फलवाटीकेजवळ हा प्रकार घडला असून याप्रकरणात खेड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
स्वप्निल अशोक इंगुले (वय २२, रा. मोशी, ता. हवेली.) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव असून शुभम अजय कांबळे (वय २४) आणि सिराज अब्दुल सलाम ( दोघे रा. मोशी, ता. हवेली.) यांच्यासह तीन आरोपींना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल इंगुले आणि पाचही आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. हे सगळे चांडोली येथील महाराष्ट्र फल उत्पादन फलवाटीकेजवळ मद्यपानासाठी गेलेले असताना अरोपींनी स्वप्निल इंगुले याची डोक्यात दगड घालून हत्या केली. स्वप्निल इंगुले याने आरोपीच्या बहिणीची छेड काढल्याचा आणि आरोपीच्या आईसोबत अश्लिल भाषेत बोलल्याचा राग मनात ठेवून त्याची हत्या केली असल्याची कबूली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
पहा गुन्ह्याची सविस्तर माहिती ‘सह्याद्री लाइव्ह’ YouTube Channel वर – https://youtu.be/uN93oFrfZRA
या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून इतर तीन अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक काबगुडे हे अधिक तपास करत आहेत.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES