एस. टी. महामंडळाला ३५५ कोटींचा निधी; सवलतींमुळे वाढला खर्च
प्रवास भाड्यातील सवलतींच्या प्रतिपुर्तीसाठी ३२१.१८ कोटी
पुणे । सह्याद्री लाइव्ह । राज्य सरकारने एस. टी. महामंडळाला ३५५ कोटींचा निधी दिला आहे. कर्मचा-यांचे पगार आणि सवलमुल्यपुर्तीसाठी हा निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील फक्त ३३.८२ कोटी रूपये कर्मचारी वेतनासाठी देण्यात आले असून उर्वरित ३२१.१८ कोटी रूपये हे एस. टी. प्रवास भाड्यातील सवलतींच्या प्रतिपुर्तीसाठी देण्यात आले असल्याचा जीआर गृहविभागाकडून जारी करण्यात आला आहे.
एस. टी. महामंडळाला दरवर्षी कर्मचारी अधिका-यांचे पगार देण्यासाठी त्याच बरोबर देखभाल दुरूस्ती आणि इंधन खर्च म्हणून निधी दिला जातो. या निधीतून एस. टी. बसच्या उत्पन्नानंतर राहिलेली तूट भरून काढली जाते.
सवलतमुल्यपुर्ती आणि इतर खर्च मिळून दरवर्षी ३०० कोटींच्या आसपास निधी शासनाकडून महामंडळाला वितरित केला जातो. वृद्ध आणि महिलांसाठी दिलेल्या सवलतींमुळे प्रवाशांचे प्रमाण वाढले असूनही सवलतमुल्य वाढल्यामुळे यावर्षी खर्चही वाढला आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES