पीएफ कार्यालयातर्फे 7 जानेवारीला ऑनलाइन पेन्शन अदालत
by
sahyadrilive
December 31, 2021 12:39 PM
पुणे : भविष्य निर्वाह निधी कार्यालय (पुणे विभाग)तर्फे 7 जानेवारी रोजी ऑनलाइन पेन्शन अदालत भरविण्यात येणार आहे. पेन्शन तसेच पीएफ संबंधी दाव्यांचा निपटारा यावेळी करण्यात येईल. तसेच पेन्शन आणि पीएफ संबंधिच्या योजनांची माहितीही देण्यात येईल.
दिल्ली स्थित पीएफ कार्यालयाच्या सूचनेनुसार देशभरातील पीएफ कार्यालयांमार्फत दरमहिन्याला ऑनलाइन पेन्शन अदालत भरविण्यात येते. रिसिट ऑफ पेन्शन, डिजिटल लाईफ सर्टीफिकेट यासारख्या पेन्शनसंबंधिच्या तक्रारींचे निराकरण यावेळी करण्यात येईल. ऑनलाइन पेन्शन अदालतची वेळ दुपारी 12 वाजून 15 मिनिटांपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत असेल. अधिकाधिक संख्येने पेन्शनरांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पीएफ कमिशनर सतवत्सिंह शिऊरकर यांनी केले.