पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलची राजगुरुनगर येथे शनिवारी आढावा बैठक
खेड । सह्याद्री लाइव्ह । पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या वतीने जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख हे या आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संवाद साधणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप करंडे यांनी दिली.
राजगुरुनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता आढावा बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख हे पुणे जिल्हा राष्ट्रवादी लिगल सेलचा आढावा घेणार आहेत. या कार्यक्रमास आमदार दिलीप मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहेत.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लीगल सेलचे सर्व जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुका अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणी व कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. करंडे यांनी केले आहे.