महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, रजनिश सेठ यांच्या हस्ते “पोलीस पाटलांचा सारथी” या पुस्तकाचे प्रकाशन
आळंदी। सह्याद्री लाइव्ह । आळंदी येथे बुधवार दिनांक १५ रोजी “पोलीस पाटलांचा सारथी ” या पुस्तकाचे प्रकाशन, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, रजनिश सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रकाशन वेळी रितेशकुमार, पो. आयुक्त पुणे शहर, चौबे, पो. आयुक्त पिंपरी चिंचवड, अ. पो. महासचालक, CID, प्रशांत बुरडे, अ. पो. महासंचालक, गुप्ता, अ. पो. महासंचालक, रामानंद, वि. पो. महानिरीक्षक, फुलारी, हिरेमठ, संजय शिंदे, DIG, पंकज देशमुख, SP ज्योती क्षिरसागर SP, CPR, इ. वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सदर पुस्तक नि. पोलीस उप अधीक्षक, डॉ. राम पठारे यांनी लीहीलेले आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन, पोलीस संशोधन केंद्र (CPR) पुणे, या प्रतिष्ठीत संस्थेने केले आहे. पुस्तकाची प्रस्तावना अ.पो. महासंचालक (नि.) अशोक धिवरे IPS यांनी लीहीली आहे. पुस्तकास जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच मा राधा कृष्ण विखेपाटील, महसूलमंत्री यांनी पत्रद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत.
पोलीस पाटील हा गाव पातळीवरील शासनाचा शेवटचा व महत्वाचा घटक असून त्यांच्या साठी हे पुस्तक खूप उपयुक्त होणार आहे. पो. पाटलांचे कायदे विषयक ज्ञान वृध्दीगत व्हावे, या दृष्टीने या पुस्तकात ५० पेक्षा जास्त कायद्यांचा समवेश केलेला आहे. हे पुस्तक सर्व सामान्य नागरीकांना तसेच नव प्रविष्ट पोलीसांनादेखील उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.