तलाठी भरतीच्या उमेदवारांकडून जास्तीची फी वसूली; सरकारी तिजोरीमध्ये १२७ कोटी रूपये जमा
पुणे । सह्याद्री लाइव्ह । राज्य सरकारने तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती जाहीर केली. या भरतीसाठी १३ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दरम्यान पाच लाखांपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल होऊनसुद्धा सरकारने परीक्षा शुल्क कमी केले नाही. त्यामुळे सरकार उमेदवारांकडून जास्त शुल्क घेत असल्याचा आरोप किशोर जोरगेवार यांनी केला आहे.
नोव्हेंबर २०२२ च्या जीआरनुसार, एखाद्या शासकीय भरती परीक्षेत ५ लाखांपेक्षा जास्त उमेदवार सहभागी होत असतील तर परीक्षा शुल्क ४९५ रूपये आणि १५ टक्के प्रशासकीय कार्यालयाचा खर्च असे ५५० रूपये आकारले जावेत असे म्हटले आहे. मात्र तलाठी भरतीमध्ये १३ लाखांपेक्षा अधिक अर्ज आलेले असतानाही जास्त शुल्क आकारले गेले आहेत.
सरकारने तलाठी भरतीच्या अर्जासोबत सर्वसामान्य प्रवर्गासाठी १ हजार रूपये तर आरक्षित वर्गासाठी ९०० रूपये शुल्क आकारले. परीक्षा शुल्कापोटी तब्बल १२७ कोटी रूपये सरकारी तिजोरीमध्ये जमा झाले आहेत. जादा आकारलेले शुल्क उमेदवारांना परत करण्यात यावे अशी मागणी जोरगेवार यांनी विधानपरिषदेमध्ये केली आहे. तलाठी भरतीसाठी पीएचडी, एमबीए, इंजिनिअर यांसारख्या उच्चशिक्षित उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत त्यामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण चर्चेचा मुद्दा ठरत आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES