लोकअदालतमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित दाव्यांमधून सुमारे १६.१४ कोटी रुपयांची विक्रमी वसुली
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६०० खटले निकाली
राजगुरुनगर, सह्याद्री लाइव्ह । येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (दि. ७) आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील १५९ खटले तडजोडीतून मिटवण्यात आले. तसेच बँक वसुली केसेस व पाणी कर वसुली सारख्या दाखलपूर्व एकूण ६०० खटले यशस्वीरित्या तडजोडीने मिटवून वसूली करण्यात आली. तर दाखलपूर्व व प्रलंबित दाव्याच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी १४ लाख २९ हजार ३८७ रुपयांची वसुली झाली आहे. खेड न्यायालयातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी वसुली आहे.
या लोकअदालतचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. राजुरकर व खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ गावडे यांचे हस्ते झाले. यावेळी राजगुरूनगर न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबळकर, एस. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती एस. एस. पाखले, के. एच. पाटील, जी. बी. देशमुख, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती आर. डी. पतंगे, डी. बी. पतंगे, पी. ए. जगदाळे, श्रीमती एन. एस. कदम तसेच खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ गावडे यांचे उपस्थितीत पार पडला.
लोकअदालतमध्ये पॅनल न्यायधीश सु. ना. राजुरकर (जिल्हा न्यायाधीश), जी. बी. देशमुख (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), श्रीमती आर. डी. पतंगे-इंगळे (सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), पी. ए. जगदाळे (सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), श्रीमती एन. एस. कदम (सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), पॅनल ॲडव्होकेट – ॲड. योगेश मोहिते, ॲड. माया डांगले, ॲड. कृष्णा भोगाडे, ॲड. सुवर्णा ढोरे, ॲड. अपेक्षा धुमाळ, ॲड. अर्चना राक्षे, ॲड. वैभव कान्हुरकर, ॲड. आदिनाथ कड यांनी काम पाहिले.
या लोकअदालतीसाठी उपाध्यक्ष ॲड. संतोष दाते, ॲड. ललित नवले, सचिव ॲड. गोपाल शिंदे, ॲड. रेश्मा भोर, लोकल ऑडिटर ॲड. संदीप दरेकर, सदस्य ॲड. अबूबकर पठाण, ॲड. निलेश देशमुख, ॲड. प्रतीभा होले यांच्यासह माजी अध्यक्ष ॲड. देविदास शिंदे पाटील आणि सर्व वकील सभासद, न्यायालयीन कर्मचारी व मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेड बार असोसिएशनच्या सदस्या ॲड. रश्मी वाघुले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. नवनाथ गावडे यांनी केले. तर अध्यक्षीय भाषण जिल्हा न्यायाधीश एस. एन. राजुरकर यांनी केले. खेड बार असोसिएशनचे खजिनदार ॲड. प्रवीण पडवळ यांनी आभार मानले.