बैलगाडा शर्यतींच्या परवानगीवर फेरविचार; शर्यती पुन्हा बंद होणार का?
‘पेटा’ची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । “बैलगाडा शर्यतींच्या परवानगीवर फेरविचार करावा”, अशी मागणी करणारी याचिका ‘द पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’ (पेटा) या संस्थेने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींसोबतच तमिळनाडूतील ‘जल्लीकट्टू’ आणि कर्नाटकातील ‘कंबाला’ या रेड्यांच्या शर्यतींनाही दिलेल्या परवानगीवर फेरविचार करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये या शर्यतींना परवानगी दिली होती. त्या निर्णयामध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्याचा फेरविचार व्हावा, अशी मागणी या संस्थेने केली आहे.
२०१७ ते २०२२ या काळामध्ये जल्लीकट्टू, कंबाला आणि बैलगाडा शर्यतींच्या प्रत्यक्ष पाहणीतून मिळालेल्या निरीक्षणांचा सविस्तर अहवाल याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला आहे. या अहवालानुसार या शर्यतींमध्ये जनावरांच्या नैसर्गिक सवयींच्या विरोधी कृत्य त्यांना करावे लागते. त्यामूळे या जनावरांना त्रास दिला जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
यापुर्वी दिलेल्या निकालामध्ये वरील वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ निरिक्षणांचा समावेश नसल्यामूळे त्यावर फेरविचार करावा अशी मागणी या संस्थेने केली आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES