Recipe : अळुवडी
by
sahyadrilive
November 27, 2022 5:47 PM
साहित्य
बेसन, अळुची पाने, मिरची लसुन, आले, जिरे, ओवा, कोथंबिर, पांढरे तिळ, मीठ, हिेग, हळद इ.
कृती
सर्वात आधी अळुची पाने स्वच्छ करुन,धुवून घ्यावी. ५ ते ७ मिरच्या, ४ ते ५ लसून पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा, चिमुटभर जिरे, ओवा, हिेग, कोथंबिर बारीक वाटुन, एका भांड्यात बेसन चाळुन घ्यावे.
वाटलेले वाटण, आवश्यकतेनुसार मीठ, हळद, एक चमचा पांढरे तिळ, हलकेसे पाणी टाकुन मिश्रण एकत्र करुन घ्यावे. नंतर अळुची पाने सपाट पसरवुन ते तयार मिश्रण त्या पानांवर सगळीकडे व्यवस्थित पसरवुन घ्यावे. त्या पानाची वळी बनवुन मंद आचेवर १० ते १५ मिनीटे चांगली शिजवुन घ्यावी. अळुची वडी शिजल्या नंतर आवश्यक त्या जाडीच्या वड्या सुरीच्या मदतीने कापुन,तेलात मंद आचेवर तळुन घ्याव्या.
( टिप: अळुवडी शिजवताना जरा जास्त वेळ शिजवावी, नाही तर अळुवडी खाताना घशात कापते )