चाकणच्या साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेसाठी फेरमतदान होणार
चाकण । सह्याद्री लाइव्ह । चाकणमधील साईबाबा ग्रामीण बिगरशेती यापुर्वी पतसंस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला होता. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया प्रशासनाला हाताशी धरून बोगस मतदान झाल्याची गंभीर बाब मतमोजणीच्यावेळी समोर आली होती.
याप्रकारानंतर ही निवडणूक पुन्हा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी सहकारी संस्था खेडचे सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांना पुन्हा मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले आहेत.
साईबाबा पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत मतमोजनीचे वेळी प्रत्येक प्रवर्गातील ५०० बोगस मतपत्रिका आढळून आल्या होत्या. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या आवारात एकच गोंघळ उडाला होता. त्यानंतर ही मतमोजणी बंद करण्यात आली होती.
या निणडणूकीतील उमेदवार आणि पंतसंस्थेचे सभासद यांनी या गैरप्रकारासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकारानंतर वरिष्टांच्या आदेशावरून या निवडणूकीचे निवडणूक अधिकारी एस. एम. धादवड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर या निवडणूकीशी संबंधीत प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात आली होती.
या बोगस मतदानाच्या प्रकारानंतर जवळपास दोन महिन्यानंतर या प्रकरणावर ठोस निर्णय घेण्यात आला आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवण्यात येणार आहे कि त्याच उमेदवारांसाठी पुन्हा एकदा फक्त मतदान घेतले जाईल याबद्दल अजून स्पष्टता दिली गेली नाही.