खेड तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध लाेकनियुक्त सरपंच
by
sahyadrilive
December 8, 2022 4:10 PM
खेड । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणा-या २३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. अर्ज प्रक्रिया आणि छाननी झाल्यानंतर बुधवारी माघार घेण्याचा दिवस होता. या प्रक्रियेनंतर सात ग्रामपंचातींमध्ये बिनविरोध लोकनियुक्त सरपंचांची निवड झाली.
तालुक्यातील मांजरेवाडी आणि येलवाडी या दोन ग्रामपंचायती इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध झाल्या. अनिता विलास मांजरे यांची मांजरेवाडी आणि रणजीत विठ्ठल गाडे यांची येलवडे गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर पश्चिम पट्यातील वाडा गावात रुपाली शिवाजी मोरे, देवाशीच्या लीला देवराम लव्हाळे, भांबोलीच्या शीतल काळुराम पिंजन, अनावळेच्या अश्विनी कुडेकर, आणि आंभू गावच्या वच्छला कांबळे यांच्या गळ्यात बिनविरोधाची माळ पडली.