विधानसभा निवडणूकीच्या लढतीत रविंद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा विजयी
by
sahyadrilive
December 8, 2022 3:02 PM
जामनगर । सह्याद्री लाइव्ह । गुजरातच्या विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनी जामनगर उत्तरमधून भाजपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांच्या समोर काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा आणि आपचे करसन करमोरे याचे आव्हान होते. या लढतीत रिवाबा जडेजा १५००० हून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
निवडणूक जिंकल्यानंतर रिवाबा जडेजा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ज्यांनी मला उमेदवार म्हणून स्वीकारले आणि माझ्यासाठी काम केले, त्यांच्यासोबत मी माझे यश समर्पित करते.’ असं रिवाबा जडेजाने म्हटलं आहे.