एम आय टी आर्टस् कॉमर्स व सायन्स महाविदयालयात रास गरबा 2022 उत्साहात पार पडला
आळंदी ।सह्याद्री लाइव्ह। नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया ची धूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील टीम कॉनकरर आणि नादब्रह्मा सांस्कृतिक कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रास दांडिया घेण्यात आला त्याच बरोबर मुलांचा उत्साह वाढवाण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेसेंटेशन, सांस्कृतिक पोशाख परिधान स्पर्धा व नाटक स्पर्धा ठेवन्यात आल्या होत्या. स्पर्धा झाल्यानंतर हजार हुन अधिक मुलांनी रास दांडिया चा आस्वाद घेतला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेश परिधान केलेला होता. महाविद्यालयच्या गार्डन मध्ये हा कार्यक्रम रंगला होता. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक अश्या बहारदार गाण्यावर गरब्याच्या ताली खेळल्या. महिला शिक्षक वर्गाने देखील या रास दांडियाचा आस्वाद घेतला.
स्पर्धेमधील विजेत्यांचे व आयोजकांचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजन टीम कॉनकरर व सांस्कृतिक कक्ष अधिकारी प्रा. अमित ताले यांनी केले.