रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य; राज्यभरातुन संतप्त प्रतिक्रिया
by
sahyadrilive
November 26, 2022 11:33 AM
ठाणे । सह्याद्री लाइव्ह । योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. महिलांच्या कपड्यांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांकडून निषेध केला जात आहे.
बाबा रामदेव म्हणाले, “साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”.
ठाण्यातील हायलँड मैदानामध्ये आयोजित योगा कार्यक्रमामध्ये ते बोलत हाते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, अमृता फडणवीस, आमदार रवी राणा आणि दीपाली सय्यद उपस्थित होते.