खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची राजस्थान सहल संपन्न
by
sahyadrilive
February 17, 2023 11:57 AM
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । नुकतीच खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची राजस्थान सहल यशस्वी पार पडली. विशेष म्हणजे अगदी 86 वयाचे देखील ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी झाले होते हे विशेष. जयपूर, अजमेर, पुष्कर, बिकानेर , हळदी घाटी, जैसलमेर, जोधपूर, उदयपुर, चीतोडगड या ठीकानांना भेटी देऊन या वयात देखील पर्यटनाचा आनंद लुटला.
या सहलीत एकूण 35 स्त्री पुरुष, ज्येष्ठांनी सहभाग घेतला. सहलीच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर, कार्याध्यक्ष, विलास जाधव, गाढवे आण्णा, संचालक एकनाथ वाळुंज, अनंत भालेकर, राजन जांभळे यांनी परिश्रम घेतले. ‘आरोही टूर्स’ चे किरण गाढवे यांनी अत्यल्प किमती मध्ये सहलीचे छान नियोजन केले.