खेड तालुक्यात पाऊस थांबला; भामा आसखेड धरण पुर्ण भरेल का?
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात एकूण ६.७५ टीएमसी म्हणजे धरणाच्या एकून क्षमतेपैकी ८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात ६.२८ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. पाऊस थांबल्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चासकमान धरणाच्या तुलनेत या धरणात पाण्याची आवक आणि साठा दोन्हीही कमी आहे. या वर्षी भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ४८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सध्या धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिली असली तरीही तरीही शिवे, वहागाव, देशमुखवाडी, आंबोली, वांद्रा, कोळीये, आंभू, पाईट, पाळू, वाघू, तोरणे, अहिरे आदी भागातून काही प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत आहे. खेड तालुक्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे भामा आसखेड धरण पुर्ण भरेल का असा प्रश्न सध्या पडला आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES