पुतिन यांनी केलं भारतीयांचं तोंडभरुन कौतुक
मॉस्को । सह्याद्री लाइव्ह । ”भारताकडे बघा, येथील लोक स्वतःच्या विकासासाठी जागरुक आहेत. ती प्रतिभा त्यांच्यात आहे. त्यामुळे निश्चितपणे भारताला याचा फायदा होणार आहे.” असे उद्गार काढत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीयांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
भारतीयांचा उल्लेख करतांना त्यांनी ‘प्रतिभाशाली’ ही उपाधी दिली आहे. शुक्रवारी संपन्न झालेल्या रशिया एकता दिवशी बोलताना पुतिन म्हणाले की, विकासाच्या बाबतीत भारत पुढे जाणार आहे. जवळपास दीड अरब लोक हे भारताची ताकद आहेत.
यापुर्वीही मॉस्को येथील ‘थिंक टँक वालदाई इंटरनॅशनल डिस्कशन क्लब’ द्वारे आयोजित अधिवेशनात पुतिन यांनी भारताचे कौतुक केले होते. त्यावेळी “रशियाचे भारतासोबत खास संबंध आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांना साथ दिलेली आहे. शिवाय भविष्यात हे नातं अबाधित राहिल”, अशी पुष्टी त्यांनी दिली होती.