Pune | हडपसरची ‘सौम्या कांबळे’ ठरली इंडियाज बेस्ट डान्सर सिझन-2 ची विजेती
हडपसर : हडपसर सातववाडी येथील सौम्या अनिल कांबळे ( Saumya Kamble ) ही इंडियाज बेस्ट डान्सरच्या ( India’s Best Dancer 2 Winner ) अंतिम फेरीत विजेती ठरली आहे . तिच्या विजयानंतर हडपसर – सातववाडी परिसरातील रहिवाशांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.
सोनी टेलिव्हिजन वाहिनीवरील लोकप्रिय डान्स रिआलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन-२’ मध्ये तीने सहभाग घेतला होता. अंतीम फेरीत हडपसरसह पुणेकर प्रेक्षकांनी सौम्याला भरभरून मतदान केले होते. अंतिम फेरीत विजयी ठरल्यानंतर पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे यश मिळाल्याचे सौम्याने सांगितले तर दिलेल्या सपोर्टमुळेच आज इथपर्यंत पोहोचले असे सांगत तिने पुणेकरांचे आभारही मानले आहेत .
सौम्याला सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनीकडून 15 लाख रुपयांचा धनादेश देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे. तसंच तिला एक आलिशान कार देखील बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे.
सौम्याच्या वडिलांनी दिला ‘डान्स स्टुडिओ’ सप्रेम भेट
आपली मुलगी या शोमध्ये इथपर्यंत येऊन यशस्वी झाली. असा अनेक मुला-मुलींना यशस्वी होतांना पहायचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त करतानाच भावूक झालेल्या सौम्याच्या वडिलांनी तिच्यासाठी एक डान्स स्टुडिओ सप्रेम भेट देऊ केला आहे. अंगात कलागुण आहेत, मात्र कुटुंबातून सपोर्ट होत नाही. ज्यांना सराव करण्यासाठी हॉल नाही, अशा मुलांसाठी हा स्टुडिओ ओपन असणार असून त्यात सौम्या स्वतः सहभागी होऊन मुलांना मार्गदर्शन करेल. अशी भावना सौम्याचे वडील डॉ. अनिल कांबळे यांनी व्यक्त केली.
“पालकांनी आपल्या पाल्याची आवड ज्या क्षेत्रात आहे. त्यात त्याला प्रोत्साहित करावे. पुणेकरांनी सौम्याला भरभरून प्रेम दिले .सपोर्ट केला, त्याबद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.आशाताई भोसले देखील सौम्याच्या मोठ्या फॅन आहेत. आशा भोसले शोमध्ये आल्या होत्या त्यावेळी तिचा डान्स पाहून त्या खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी सौम्याला छोटी हेलेनचीच पदवी दिली आणि नटराजमूर्तीही भेट दिली तो क्षण अविस्मरणीय आहे.
– डॉ. अनिल कांबळे (सौम्याचे वडील)