मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन
by
sahyadrilive
January 2, 2022 12:25 PM
मुंबई : राज्य शासनाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. अभिजात मराठीची महती या दिनदर्शिकेत मांडण्यात आली आहे. अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक हरी नरके यांनी याकरिता बहुमोल मार्गदर्शन केले आहे. ही दिनदर्शिका डिजिटल रुपात उपलब्ध आहे