सहकाराचे सिद्धांत आणि कार्यपद्धती पुस्तकाचे प्रकाशन
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर येथील साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील डॉ. उमेश भोकसे व प्रा. अभिजीत बेंडाले यांनी लिहिलेल्या ‘सहकाराचे सिद्धांत आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाचे प्रकाशन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी डॉ. प्रदीप शेवाळे, अरविंद दौंडकर, सुदाम गाडे, सुदाम शिंदे, मारूती आंद्रे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.
डॉ. भोकसे व प्रा. बेंडाले यांनी या पुस्तकात भारतातील सहकार चळवळीचा इतिहास, सहकार संस्थांचे प्रकार, सहकार व्यवस्थापन, सहकार चळवळीतील खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण या धोरणांचा परिणाम, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण या विषयांवर लेखन केले आहे.
संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी दोन्ही लेखकांचे अभिनंदन करताना प्राध्यापकांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांबरोबर समाजालाही व्हावा, यासाठी त्यांनी लिहीते व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.