राजगुरुनगरमध्ये मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ हुतात्मा राजगुरुंच्या पुतळ्यासमोर मुकमोर्चा
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । मणिपूरमध्ये हिंसाचार टोकाला गेला असून अनेक लज्जास्पद घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी समाजकंठकांनी महिलेचा बलात्कार करून तिची नग्न धिंड काढली होती. या घटनांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजगुरुनगरमधील सर्व संघटनांनी मिळून हुतात्मा राजगुरुंच्या पुतळ्यासमोर मुकमोर्चा काढत या घटनेचा निषेध केला.
राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरु फाऊंडेशन आणि किसान महासभा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ मुकमोर्चा काढला होता. यावेळी वक्त्यांनी मणिपूर घटनेवर निषेध व्यक्त करत केंद्रातील भारतीय जनता पक्षावर सडकून टिका केली.
या मोर्चासाठी हुतात्मा राजगुरु फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप होले, पुणे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, पंचायत समितचे माजी सभापती सतीश राक्षे, रज्जाकभाई शेख, सुरेखा क्षत्रिय, अमर टाटीया, डॉ. शीतल ढवळे, डॉ. कुंतल जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यक्रते उपस्थित होते.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES