डाळींब, संत्रा, मोसंबी, खरबूज, बोरे, लिंबू महागले
आवकच्या तुलनेत मागणी जास्त
पुणे : आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने (दि. 9) डाळींब, संत्रा, मोसंबी, बोरे, लिंबे, खरबूजाच्या भावात वाढ झाली. सफरचंदाच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी येथील बाजारात कलिंगड दोन ते तीन टेम्पो, खरबूज दोन ते तीन टेम्पो, अननस 7 ट्रक, मोसंबी 25 ते 30 टन, संत्री 15 ते 20 टन, डाळींब 20 ते 25 टन, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू 600 ते 700 क्रेट, चिकू दोन हजार बॉक्स, बोरे 250 ते 300 गोणी, सफरचंद दीड ते दोन हजार पेटी, द्राक्षे 10 ते 12 टन इतकी आवक झाली.
लिंबाच्या गोणीमागे 50 रुपयांनी वाढ झाली आहे. डाळींब, संत्रा आणि मोसंबी दहा टक्क्यांनी, खरबूज किलोमागे पाच रुपयांनी तर बोरे 20 ते 25 टक्क्यांनी महागली आहेत, तर सफरंचदाच्या पेटीमागे शंभर रुपयांनी घट झाली आहे
फळांचे भाव
लिंबे (प्रति गोणी) : 250-350, अननस (डझन) : 70-270, डाळींब (किलो) भगवा : 40-180, आरक्ता : 20-60, गणेश 10-30, मोसंबी : (3 डझन) : 320-550, (4 डझन) : 150 ते 250, संत्रा : (10 किलो) : 300-700, कलिंगड: 20-25, खरबूज : 30-40, पपई : 10-12, चिकू ( 10 किलो) 100-500, पेरू (20 किलो) : 400-500, काश्मीर डेलिसिअस (15 ते 16 किलो) : 1000-1300, किन्नोर (25 ते 30) : 3000-3500, बोरे चमेली (10 किलो) : 300-400, उमराण : 80-120, चेकनट : 800-850, चण्यामण्या : 800-900 द्राक्षे जम्बो (10 किलो) : 500-900, सोनाका : 400-700, माणिकचमण : 400-500
बोरांना मागणी वाढली
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बोरांना मागणी वाढली आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने भावात तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली. वाढलेले भाव संक्रांतीपर्यंत चढेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.