पोलीस भरतीचं बनावट नोटिफिकेशन
by
sahyadrilive
November 16, 2022 4:25 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । सध्या सोशल मीडियावर पोलीस भरतीचं बनावट नोटिफिकेशन व्हायरल होत आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची फसवणूक यामधून केली जात असून याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या गृह विभागाचे सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या नावाने बनावट नोफिकेशन येत असल्यामूळे गृहविभागानं सचिवांच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांत तक्रार दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. कलम ४१९, ४२०, ४६५, ५११ या विविध कलमांतर्गत या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.