राजगुरुनगरमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिनी ‘फोर्टीन ट्रीज’च्या वतीने वृक्ष लागवड
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून फोर्टीन ट्रीज संस्थेने राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीमध्ये वृक्षारोपणाचा शुभारंभ केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगुरुनगर क्रमांक एक आणि दोनच्या प्रांगणात तसेच वाडा रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणामध्ये फोर्टीन ट्रीज संस्था वेताळे यांनी चमकदार कामगिरी केली आहे. ‘माझी वसुंधरा 4.0’ अंतर्गत राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा व संवर्धनाचा संकल्प केला असून या कामी फोर्टीन ट्रीज संस्था वेताळे व पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्था सहकार्य करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी लाळगे यांनी दिली.
याप्रसंगी फोर्टीन ट्रीज संस्था वेताळे संस्थेचे व्यवस्थापक अनंत तायडे, राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे, खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जीवन कोकणे तसेच माजी नगरसेवक मनोहर सांडभोर, मंगेश गुंडाळ, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे, सदस्य जी. र. शिंदे, संगणक अभियंत्या प्रतीक्षा निकुंभ, मुख्याध्यापक द. मा. पिंगळे, मुख्याध्यापिका अलका शिंदे, रवींद्र मावळे तसेच वृक्षप्रेमी बाभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES