आचारसंहितेच्या आत निधीचे नियोजन करा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या धोरणात्मक विषयांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश
धुळे : जिल्हा वार्षिक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 50 कोटी रुपयांचा ‘आव्हान निधी’ मिळणार आहे. हा निधी मिळवून धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यान्वयीन यंत्रणांनी कालबद्धरित्या प्रक्रिया राबवावी, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्यकारी समितीची बैठक आज दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री सत्तार हे मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले, की जिल्हा वार्षिक योजना 2021- 22 चा 99 टक्के निधीचा विनियोग केला आहे. आता 2022- 23 या आर्थिक वर्षात ‘आव्हान निधी’ प्राप्त करण्यासाठी सर्व विभागांनी सांघिक प्रयत्न करावेत. कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत. जिल्हा वार्षिक योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेवून योजनेच्या कामांना गती द्यावी. तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्य अग्निश्यामक यंत्रणेची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राबवावी, अशाही सूचना पालकमंत्री सत्तार यांनी दिल्या.
धोरणात्मक निर्णयासाठी जिल्ह्यातील महत्वाचे फेर प्रस्ताव सादर करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला कामांचे अचूक नियोजन करण्याचे निर्देश दिलेत. ते म्हणाले की, आगामी काळातील निवडणुका आणि या अनुषंगाने लागणारी आचारसंहिता लक्षात घेता आधीच सर्व कामांचे नियोजन करून प्रशासकीय मान्यता घ्यावी. तसेच त्यांनी या प्रसंगी काही प्रलंबीत कामांचे फेरप्रस्ताव पाठविण्याचे देखील निर्देश दिलेत. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद अंतर्गत नवीन बांधकामाचा प्रस्ताव; पुलासह जुन्या जि.प. इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव, तहसीलसाठी नवीन इमारत, अपर तहसीलसाठी इमारत, वीज मंडळाचे दोन विभागात विभाजन, एकात्मीक विकास कार्यालयाचे उपमुख्य कार्यालय जळगावात सुरू करणे; भुसावळ, भडगाव व चाळीसगावात उपप्रादेशीक परिवहन कार्यालय सुरू करणे; शहरी भागात नवीन आंगणवाडी आणि आशादीप महिला वसतीगृहाची उभारणी करणे; तालुका क्रीडा संकुलांसाठी व्हिजन डॉक्युमेंट सादर करणे, पर्यटन योजनेच्या अंतर्गत १७ कामांचे प्रस्ताव सादर करणे, जिल्ह्यातील कमकुवत पुलांची माहिती घेऊन यावर सार्वजनीक बांधकाम खात्यातर्फे निर्णय घेणे तसेच महत्वाचे म्हणजे बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकांना गती देण्यासाठी फेरप्रस्ताव दाखल करण्यात यावेत असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत.
याप्रसंगी कामांचे अचूक नियोजन आणि कार्यान्वयनासाठी पालकमंत्र्यांनी खालीप्रमाणे निर्देश दिले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ राबविण्यासाठी शासन निर्णयानुसार रु.३७.०० कोटी निधीची तरतूद करावी. दिनांक १८ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार प्रति किमी रु.७५.०० लाख निधी असून, जिल्हयासाठी दोन वर्षात ३७० किमी मंजुरीचे उदीष्ट आहे. या अनुषंगाने संबंधीत यंत्रणांनी आमदारांशी संपर्क करुन रस्ते मंजुरीबाबत कार्यवाही करावी.