स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ जुलै २०२२ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण / पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जय महाराष्ट्र गणेश मैदान, महापालिका शाळा क्र.२, चिराग नगर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, पारशीवाडी, घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे ०३ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांचेवतीने करण्यात आले आहे.