पाकिस्तानच्या ‘Twitter’ अकाउंटवर भारतात बंदी
एका महीन्यातच पुन्हा बंदीची कारवाई
नवी दिल्ली। सह्याद्री लाइव्ह । भारत सरकारच्या कायदेशीर मागणीला प्रतिसाद देत ‘Twitter India’ ने पाकिस्तान सरकारच्या अधिकृत अकाउंटवर बंदी घातली आहे. ही बंदी भारतापुरती मर्यादीत असल्याने हे अकाउंट आता भारतामध्ये पाहता येणार नाही.
भारतासह अनेक देशांत कायद्यांनुसार Twitter अकाउंटवर बंदी घालता येते. याआधीही ७ सप्टेंबरला पाकिस्तानच्या या अकाउंटवर भारतानं बंदी घातली होती. पुन्हा सुरू केलेल्या या अकाउंटवर एका महीन्यातच पुन्हा एकदा बंदी आणण्यात आली आहे.
भारतामध्ये सोशल मिडियावर सोशल मीडियावर द्वेष पसरवणारे कोणतेही खाते भारत सरकारद्वारे ब्लॉक केले जाईल, असा सुचक इशारा केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यावर प्रतिक्रिया देताना दिला आहे. भारतातील ८० कोटी लोकसंख्या सध्या इंटरनेटवर आहे, ती वाढून १२० कोटी व्हावी अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी इंटरनेटचा योग्य वापर व्हायला हवा अशी भावना त्यांनी व्यकत केली.