आदर्श प्राथमिक शाळा सतारकावस्ती येथे तिरंगा प्रेरणा व्याख्यानमालेचे आयोजन
सतारकावस्ती । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा सतारकावस्ती येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम राबवले जात असतात. ‘तिरंगा प्रेरणा व्याख्यानमाला’ हा उपक्रम गेली नऊ वर्ष शाळेत राबविला जात आहे. दरवर्षी पाच दिवस शाळेत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सोपान मांजरे यांनी दिली.
कवी, साहित्यिक, कथाकार, जादूगार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शिवव्याख्याते यांची चांगली व्याख्याने विद्यार्थ्यांना ऐकायला मिळत असल्यामुळे परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगलीच संस्काराची शिदोरी मिळते.
संस्कार युवा फाउंडेशन श्रीरामनगर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतारकावस्ती तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने व्याख्यानमालेत कथाकथन – डॉ. दिलीप गरुड, नकलांचे एकपात्री प्रयोग -प्रकाश पारखी सर, ‘थोर हुतात्मे होऊन गेले’ – शशिकांत राऊत महाराज यांचे व्याख्यान, जादूचे प्रयोग – जादूगार भुजंग असे मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘जाऊ कवितेच्या गावा’ यामध्ये कवी संतोष गाढवे, साहेबराव पवळे, प्राध्यापक सुभाष साळुंखे, दादा अंगवणे, लखन जाधव, यांनी कविता सादर केल्या.
गेली दोन वर्ष व्याख्यानमालेत संस्कार युवा फाउंडेशन, शाळा व्यवस्थापन समिती, व शाळा सतारकावस्ती शिक्षक वृंद यांच्या तर्फे तिरंगा प्रेरणा पुरस्कार दिले जातात. यावर्षी क्रीडा प्रकारात लांब उडी व उंच उडी मध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या शुभम कुमार प्रजापती शाळा आंबेठाण, आदर्श शिक्षक म्हणून रविकिरण भोसले सर, शाळा आमराळवाडी तसेच आदर्श शाळा व्यवस्थापन समिती म्हणून शाळा टेमगिरवाडी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुलांना पाच दिवस नाश्ता व जेवण गोविंदा टिजगे, संतोष मांजरे, भाऊसाहेब जाधव, लहानु पवार विलास घनवट, संजू हिंगे, राजू हिंगे यांच्यातर्फे देण्यात आले. या व्याख्यानमालेसाठी प्रियाताई नारायण पवार, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा, दिलीप मेदगे समन्वयक पुणे नाशिक महामार्ग, सतीश राक्षे मा. सभापती, प्रा. बापूसाहेब चौधरी, बाळासाहेब रेटवडे उपाध्यक्ष रोकडोबा पतसंस्था, अतुल थिटे उद्योजक, दिलीप डुबे उपसरपंच, किरण पवार सदस्य ग्रामपंचायत रेटवडी, द्वारकानाथ टिजगे माजी सरपंच, शिवाजीराव वाबळे चेअरमन, सुनील वाबळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, धनेश म्हसे सचिव खेड तालुका काँग्रेस पक्ष, विलास पवार, शरद मांडेकर, निलेश पवार फौजी, सुदामराव वेहळे, बाबाजी शिंदे सर, मधुकर गिलबिले सर, संभाजी पवळे अरुण जाधव, सुरेखाताई डुबे, छाया रामदास पवार, नन्ही कली स्टाफ आदींनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुगुटराव मोरे, नंदकुमार वाघमारे, स्मिता शिंदे, व स्वागत गीत गणेश चक्कर, सुवर्णा गाडीलकर, प्राजक्ता नेटके रांगोळी सौजन्य अनिता वाळुंज, प्रणोती गावडे, अस्मिता वाकचौरे, शिल्पा शेलार, व आभार प्रदर्शन बाळासाहेब जाधव, पांडुरंग देवडे यांनी केले.