ग्रंथालय विभाग व रिसर्च सेल याच्या वतीने ‘गूगल रिसर्च टूल’ या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । माईर्स एम. आय. टी. आर्टस् ,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज आळंदी (दे) ,पुणे येथे ग्रंथालय विभागातर्फे व रिसर्च सेल याच्या सयुंक्त विद्यमाने प्रथम वर्षांमध्ये शिकणाऱ्या विधार्थां करिता कार्यशाळा गूगल रिसर्च टूल या एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
यामध्ये संशोधन साधनांसह नवोदित आणि तरुण संशोधकांना जागरुक बरोबर , Google Scholar, Google Desktop Search (PKM Tools), Google Drive (Cloud Tools), Google Forms (Online Questionnaire), Google Books न्यूज एग्रीगेटर्स, MHRD रिसोर्स, याचे प्रशिक्षण या वेळी देण्यात आले.
विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत संशोधनाचा अर्थ आणि महत्त्व आणि गूगल टूलसचा रिसर्चसाठी वापर कसा केला पाहिजे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेमध्ये १६४ विद्यार्थांनी भाग घेतला. या कार्यशाळा ही दोन सेशनमध्ये घेण्यात आली. पहिला सेशन थेरी लेक्चर आणि दुसरा सेशन हा प्रॅक्टिकल होता. या कार्यशाळेकरीता गेस्ट स्पीकर म्हणून खेतान आणि कंपनी मुंबई येथील इन्फॉरमेशन मॅनेजर प्रा. प्रल्हाद जाधव हे होते.
कार्यशाळाचे उद्घाटन महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी केले. तसेच कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभागाचे विभाग प्रमुख राहुल बारथे, रिसर्च सेल विभागाचे विभाग प्रमुख अनिकेत नागणे, ग्रंथालय विभागातील निलेश मते, सुनीता साबळे, सारिका पडवळ, सुवर्णा सानप, संगणक प्रयोगशाळा समन्वयक संदीप मुळे, ऋतूंज देशमुख, पंकज मोरे, मंगेश सोनावणे यांनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निशिगंधा भालेकर यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. मानसी अतितकर आणि उपप्राचार्या प्रा. अक्षदा कुलकर्णी, बीबीए विभागाचे विभागप्रमुख डॉ. मंगेश भोपळे, बीबीए सीए विभागाचे विभागप्रमुख डॉ. विकास महाडूळे, बी. एसी (संगणकशास्त्र) विभागाचे विभागप्रमुख डॉ. संगीता बिराजदार, गणित विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रदीप पानसरे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.