नारायणगावमध्ये जांभूळ पीक परिसंवादाचे आयोजन
by
sahyadrilive
February 23, 2023 4:26 PM
नारायणगाव । सह्याद्री लाइव्ह । कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) व जांभूळ बागाईतदार संघ यांच्या वतीने नारायणगाव येथे जांभूळ पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत होणाऱ्या परिसंवादात जांभूळ पीक व्यवस्थापन या विषयी विविध तज्ज्ञ, संशोधक व शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
परिसंवादात कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर व केव्हीकेच्या निवेदिता शेटे हे अनुक्रमे जांभूळ लागवड, संगोपन, कीडरोग, व्यवस्थापन व जांभूळ प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.