खेड तहसिलदार कार्यालयामध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर येथील खेड तहसिलदार कार्यालयामध्ये शासनाच्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. ५) करण्यात आले होते. माजी सैनिकांसाठी महसूल सप्ताहांतर्गत महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम राबवला आहे.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पोपट पडवळ, खेड तालुका अध्यक्ष अमित मोहिते, अप्पर तहसिलदार नेहा शिंदे, निवासी नायब तहसिलदार मदन जोगदंड यांच्यासह माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता, वीरपिता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा उपक्रम राबवला जात असून या उपक्रमातून आजी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना महसूल कार्यालयाकडून देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे यांचे वाटप करण्याबरोबरच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे आणि इतर प्रशासकीय समस्यांवर शासकीय कार्यालयांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES