नवाब मलिकांविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश
वाशिम। सह्याद्री लाइव्ह । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये आहेत. नुकताच त्यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोर्टात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणीत कोर्टाने हा आदेश दिला आहे. तसेच त्यांचा जामिन अर्जदेखील कोर्टाने फेटाळली आहे.
एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखडे यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी वाशिम सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मलिक यांनी जातीचे कादगपत्रे समोर आणत वानखडेंनी खोटे कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यासंदर्भात नवाब मलिक यांच्याविरोधात उद्या वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.