वसंतराव मांजरे विद्यालयात ‘एक विद्यार्थी-एक झाड’ उपक्रम
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कारगील दिनाचे औचित्य साधून ‘वृक्षदान’ कार्यक्रम
खेड (मांजरेवाडी, पिंपळ) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कारगिल दिनाचे औचित्य साधून कै. वसंतराव मांजरे विद्यालयात, ‘वृक्षदान’ कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना रोपे वाटप करण्यात आली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रत्येकी एक रोप अशी १६५ रोपे देण्यात आली. शाळेने यापूर्वी वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबविला. शालेय परिसरात सुमारे १५० वृक्ष संवर्धित केलेले आहेत.
हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष किरण मांजरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान व श्री विठ्ठल रखुमाई शिक्षण प्रसारक मंडळ, मांजरेवाडी संयुक्त विद्यमाने, प्रतिष्ठान अध्यक्ष पी. टी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक वनाधिकारी गवते, तसेच प्रतिष्ठान पदाधिकारी जिजाराम शिंदे, विठ्ठल भोर, राजन जांभळे, पत्रकार हनुमंत देवकर, सरपंच अनिता मांजरे, संस्था उपाध्यक्ष काळूराम मांजरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास मांजरे, तसेच माजी विद्यार्थी कैलास मांजरे, माजी उपसरपंच अशोक मांजरे, ग्रामस्थ बाळासाहेब मांजरे, विलास भानुदास मांजरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शाळा कर्मचारीवृंद, पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन संस्था सचिव मुरलीधर मांजरे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक विष्णूपंत मेदगे. पी. के. पवळे यांनी आभार मानले.