नवरात्रोत्सवानिमित्त विघ्नहर्ता ग्रुपतर्फे ‘खेळ रंगला पैठणीचा’, व्याख्यानासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
तरुण कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून मंडळाची यंदा पर्यावरणभिमुख ‘थीम’
खेड । सह्याद्री लाइव्ह । होलेवाडी, पाबळरोड येथील विघ्नहर्ता ग्रुप आयोजित मळगंगा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंडळाचे कार्यकर्ते, तरुणांनी पुढाकार घेत प्लास्टिक मक्तीच्या दृष्टिने एक पाऊल पुढे टाकत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. रास दांडियाबरोबरच लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, मटाका फोडीसह श्रोत्यांसाठी व्याख्यान, महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. विशेष म्हणजे यंदा नवरात्रोत्सवाची ‘पर्यावरणभिमुख थीम’ वाखाणण्याजोगी आहे.
मळगंगा नवरात्रोत्सव मंडळाचे हे २४ वर्षे आहे. काेरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षे नवरात्रोत्सव साजरा करता आला नाही. मात्र यंदा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना भेटवस्तू न देता वनौषधी रोपटे देण्याचा संकल्पाची पंचक्रोशीत वाहवा मिळविली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन सावंत आणि युवा उद्योजक अंजन बांगर यांनी देवीची मूर्ती मंडळाला अर्पण केली आहे. तसेच देवीच्या मूर्तिला आरस, सजावट सोनू ऊर्फ चैतन्य होले यांनी केली. तर पिण्याच्या पाण्याचे सौजन्य युवा कार्यकर्ते सूरज होले यांनी केले आहे.
विघ्नहर्ता ग्रुपचे अध्यक्ष विशाल राक्षे, उपाध्यक्ष अभिजित होले, कार्यकर्ते स्वप्नील पिंगळे, रमेश ऊर्फ बंटी राक्षे, सोमनाथ सावंत, प्रवीण गायकवाड परिश्रम घेत आहेत. मार्गदर्शक म्हणून नामदेव चव्हाण काम पाहात आहेत.
नवरात्रोत्सवातील कार्यक्रम…
- २६ सप्टेंबर – पहिली माळ….. घटस्थापना
- २७ सप्टेंबर – दुसरी माळ ….. संगीत खुर्ची (मुले/मुली)
- २८ सप्टेंबर – तिसरी माळ….. संगीत खुर्ची (महिला)
- २९ सप्टेंबर – चौथी माळ….. मटका फोडी
- ३० सप्टेंबर – पाचवी मावळ….. दांडिया
- १ ऑक्टोबर – सहावी माळ….. व्याख्यान – प्रा. संपत गारगोटे
- २ ऑक्टोबर – सातवी माळ…… विविध गुणदर्शन स्पर्धा
- ३ ऑक्टोबर – आठवी माळ….. पैठणी महोत्सव
- ४ ऑक्टोबर – नववी माळ….. दांडिया
- ५ ऑक्टोबर – दसरा….. दांडिया