संविधान दिनानिमित्त साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात “जागर संविधानाचा” पथनाट्य सादरीकरण उत्साहात संपन्न.
राजगुरूनगर। सह्याद्री लाइव्ह। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान गौरव दिनानिमित्त “जागर संविधानाचा” या विषयावर संविधानाचे महत्त्व व संविधानाची ओळख महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने पथनाट्य महाविद्यालयामध्ये सादर करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रक प्रदर्शन, व संविधान वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, सचिव हरिभाऊ सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक बाळासाहेब सांडभोर, साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम.जरे, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कैलास पाचारणे, जेष्ठ प्रा. साईनाथ पाचारणे, प्रा. डॉ. एस. एम. जगताप, प्रा. डॉ. उमेश भोकसे, प्रा. ए. जे. बेंडाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जी. आहेरकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. एल. बुरुड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शिवम कदम, प्रा. टी. बी. वेहळे, प्रा. एम. पी. कोल्हे, प्रा. सोनाक्षी टकले, प्रा. के. डी. गोकुळे, प्रा. धनवर्षा बोऱ्हाडे, प्रा.एस. एस. देशमुख, प्रा. प्राजक्ता गदादे, प्रा. अलफिया इनामदार, प्रा. ललिता काठे, प्रा. ज्योत्सना शेलार यांच्यासह साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते