Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघ क्वार्टर फायनलमध्ये १-० ने आघाडीवर
खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं.
भारतीय महिला संघाने ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यामध्ये १-० ची आघाडी घेतलीय. हाफ टाइमपर्यंत भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवलं असून आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाविरोधात ही कामगिरी केलीय. भारताने आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली.